पोस्ट्स

चिताभस्म भाग 8

इमेज
#चिताभस्म भाग 8 पूर्वार्ध  त्या व्यक्तीला नमस्कार करून अर्जुनच्या वडिलांनी सगळ्यांना वाड्याच्या आत मध्ये घेतलं. एव्हाना बाकी सगळ्यांना जाग आली होती.  मुलं आता काहीशी सावरली होती.  पण सगळ्या मोठ्यांच्या मनात एकच प्रश्न होता....हे नेमके हरवले कोठे होते? कारण टेकडीच्या दुसऱ्या बाजूला ओसाड माळरान होतं. एकही गाव नव्हतं..... मग हा माणूस नेमका होता तरी कोण?  आता पुढे... काही वेळाने सावरल्यानंतर अर्जुनच्या वडिलांनी चहापाणी झाल्यावर सगळ्यांवरून नजर फिरवली. आणि मग त्या व्यक्तीकडे पहात ते म्हणाले, " भाऊ तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या लेकरांना आमच्यापर्यंत सुखरूपपणे आणलत. पोरं जेव्हापासून हरवली होती आम्हाला कुणाला तर काहीच समजत नव्हतं. सगळं काही वरच्याच्या भरवशावर सोडून दिलं होतं आम्ही. पण तुम्ही त्याच्या रूपातच आलात आणि आम्हाला आमची पिल्लं पुन्हा दिसली. "  " आभार कसले मानताय. ते माझं कर्तव्यच होतं. म्हणजे तुम्ही त्याच्या भरवशावर सोडून दिलं होतं ना? मग त्याच्या वतीने कुणीतरी त्याचं काम पूर्ण करणं सुद्धा गरजेचं होतं. होय की नाही? ते काम माझ्या वाट्याला आलं इतकच." तो माणूस ...

चिताभस्म भाग 7

इमेज
#चिताभस्म भाग 7 पूर्वार्ध चिनू आणि सुमेध तिच्या सेशन बद्दल बोलत असतानाच चीनूला झोप लागते. अन् त्यांचं बोलणं अर्धवट राहून जातं. पण बोलताना चीनने मांडलेले मुद्दे सुमेधला पटलेले असतात. तरीही चिनूला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे याची त्याला आणि तिला सुद्धा कल्पना असतेच.  आता पुढे... चिन्मयीच्या बाबतीत ह्या गोष्टी सुरू झाल्या ते ती पंधरा वर्षांची असताना... तोपर्यंत तिचं आयुष्य सुरळीत चालू होतं. इतर मुलांप्रमाणे ती आनंदाने आपल आयुष्य एन्जॉय करत होती.  एके दिवशी चिन्मयी तिच्या घरच्यांसोबत प्रवासाला गेली होती.  ते जिथे गेले होते ते जरा बऱ्यापैकी अवघड ठिकाणी वसलेलं गाव होतं. तिथल्या एका वास्तू कलेबद्दल नुकतंच सोशल मीडिया वरती खूप काही दिसत असल्याने चिन्मयी आणि तिच्या भावाने तिथे जाण्याचा हट्ट धरला होता. मग हो , नाही करता करता घरातले सगळेच तयार झाले आणि ते त्या गावी राहण्याची सोय बघून सुट्ट्या घालवण्यासाठी गेले.  तिथे गेल्यानंतर त्यांना ते गावाकडचं वातावरण खूपच आवडलं. त्यांची सोय सुद्धा एका अतिशय छान वाड्यात झाली होती. तो वाडा ज्यांचा होता त्यांनीच सध्याच्या वातावरणाश...

चिताभस्म भाग 6

इमेज
#चिताभस्म भाग 6 पूर्वार्ध  " काय लिहून ठेवलं आहे या पोरीच्या नशिबात काय माहित?", असं म्हणत आजी स्वयंपाक घराच्या दिशेने वळाल्या.  " असं नको म्हणूस, तिचं नशीब आणि भविष्य दोन्ही खूप चांगलं असणार आहे. देव प्रत्येकालाच आपला हिशोब पूर्ण करायची संधी देत नाही हे लक्षात ठेव. पण तिला ती संधी मिळणार आहे. आणि जेव्हा ती संधी मिळेल तेव्हा ते बघण्याचं सौभाग्य आपल्याला मिळावं एवढीच प्रार्थना कर. " , आजोबा म्हणाले.  " खरं आहे तुमचं, मी सुद्धा मनोमन त्याच दिवसाची वाट पाहत आहे.", आजी भिंतीवर असलेल्या त्या फोटोंकडे पाहत म्हणाल्या.  चिनू, देसाई कुटुंबातली महत्त्वाची व्यक्ती... आता पुढे  चिन्मयी, डॉ कडे जाऊन आल्यापासून तशी शांतच होती. आजच सेशन तिला हवं तसं झालं नव्हतं. आजच्या सेशनमध्ये तिने जे काही बघितलं होतं त्यापैकी फार कमी माहिती डॉक्टर काकांना सांगितली होती. तिने असं का केलं होतं हेच तिला कळत नव्हतं.  शेवटी त्या विचारांपासून सुटका मिळवण्यासाठी तिने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तयार केलेल्या डायरीमध्ये आजच्या सेशन बद्दल लिहायला सुरुवात केली. लिहिता लिहिता तिला अजून काही गो...

चिताभस्म भाग 5

इमेज
चिताभस्म भाग 5 पूर्वार्ध   आपल्या कथेतली दोन मुख्य पात्र मात्र त्यांच्या गतजन्मांच्या आठवणींचे गाठोड सोबत घेऊन आलेली आहेत.  मग विचार करा त्या दोघांच्याही पाप आणि पुण्याची गाठोडी किती मोठी असतील?  आता पुढे,  एकीकडे आता सदानंद आणि केशव या दोघांच्या देखरेखी खाली अमरचं ट्रेनिंग सुरू झालं होतं असं म्हणायला हरकत नाही. हळूहळू त्यांना अमरच्या वागण्यात अपेक्षित असलेले बदल दिसू लागले होते. जे भाकीत अमर बद्दल सदानंद यांना समजलं होतं ते खरं ठरेल ही भीती आता कमी होऊ लागली होती.  अमरचा प्रवास आता त्याच्या ध्येयाच्या दिशेने सुरू झाला होता.  तर दुसरीकडे,  " आता डोळे मिटून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. हळूहळू जे स्वप्न तुम्हाला सातत्याने त्रास देत त्याचा विचार करायला सुरुवात करा. मी तीन पर्यंत आकडे मोजेन आणि त्यानंतर तुम्हाला गाढ झोप लागेल. एक, दोन, तीन ...", असं म्हणून त्या व्यक्तीने चुटकी वाजवली. आणि ज्या व्यक्तीसाठी या सूचना होत्या तिला क्षणार्धात गाढ झोप लागली.  तिचा श्वास एका संथ लयीत सुरू झाला. चुटकी वाजवणारी व्यक्ती अर्थातच डॉक्टर होती. त्यामुळ...

चिताभस्म भाग 4

इमेज
#चिताभस्म भाग 4  पूर्वार्ध  जेव्हा जेव्हा सदानंद केशव यांना काही शिकवत असत, समजावून सांगत असत.... तेव्हा लहानगा अमर त्या दोघांच्या आसपासच खेळत असायचा. किंवा खेळत असल्यासारखे भासवायचा. त्याचे कान मात्र त्या दोघांची काय चर्चा सुरू आहे याकडे लागलेले असायचे.  त्याला फारसं स्पष्ट बोलता येत नसल्यामुळे तो काय बडबड करतो आहे हे अजून घरात कोणाला लक्षात येत नव्हतं. पण जर त्यांनी लक्षपूर्वक त्याचा बोलणं ऐकलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं की त्याचं नेमकं काय चाललं आहे.  आता पुढे,  पण एके दिवशी मात्र एक अतिशय वेगळी गोष्ट घडली आणि अमरच्या वागण्यात आमूलाग्र बदल झाला.  सदानंद केशवला सांगत होते.  " केशव तुला महाभारताची कथा तर माहित आहेच. धृतराष्ट्राला शंभर पुत्र झाले आणि ते सर्वच्या सर्व युद्धात मारले गेले. पण त्या कथे मागचे एक महत्त्वाचे कारण मात्र मी तुला सांगतो. जे आपल्याला विशेषतः अमरच्या बाबतीत उपयोगी पडणार आहे."  "कोणतं कारण?", केशव ह्यांनी उत्सुकतेने विचारले.  " आतापर्यंत माझी शिकवलं त्यावरून तुला हे लक्षात आलं आहेच की ह्या जगात कुठलीही गोष्ट विनाक...

चिताभस्म भाग 3

इमेज
#चिताभस्म भाग 3 पूर्वार्ध  आजोबा त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत गेले आणि त्यांनी आत मधून दरवाजा लावून घेतला. हा पूर्ण वेळ अमर भोकाड पसरून रडत होता.  पण काही क्षणातच त्याचा रडण्याचा आवाज बंद झाला. बाहेर उभे असलेल्या सगळ्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने बघितलं.  दरवाजाची कडी उघडली आणि समोरच दृश्य पाहून ते चौघेही आश्चर्यचकित झाले.  आता पुढे  दार उघडल्यानंतर त्या चौघांनीही बघितलं की अमर आजोबांच्या खांद्यावर मान टाकून शांत झोपून गेला होता. त्याला त्याच्या आजीच्या हातात देत त्यांनी झोळीत टाकण्यास सांगितलं. आणि त्यानंतर सर्वांना खोलीत आत मध्ये यायला खुणावलं.  अमर आता कमीत कमी दोन तास तरी उठणार नव्हता. त्यामुळे त्यांना बोलण्यासाठी भरपूर वेळ मिळणार होता.  दोन तासानंतर ते सर्वजण खोलीतून बाहेर पडले. खोलीत काय बोलणं झालं हे फक्त त्या चौघांना माहित होतं.  त्या दिवसानंतर अमरच्या दिवसभराचं वेळापत्रक पूर्णपणे बदललं. आकाश आणि वर्षाने तर जणू काही त्याला आजोबांच्या ताब्यात देऊन टाकलं होतं. त्या कार्यक्रमानंतर प्रत्येक गोष्टीत चिडचिड करू लागलेला अमर काही दिवसातच पहिल्यासारख...

चिताभस्म भाग 2

इमेज
#चिताभस्म भाग 2  विनाशातून निर्माण होणाऱ्या नव्या अस्तित्वाची कथा पूर्वार्ध  तिने नजर उचलून समोर बघितलं... तिला अपेक्षित नसलेली दोन पावलं तिला दरवाज्याच्या उंबऱ्याजवळ दिसली... आणि त्यानंतर फक्त आणि फक्त अग्नीच्या ज्वाला तिच्या डोळ्यासमोर तांडव करत होत्या... हीच तिच्या आत्म्याकडे असलेली शेवटची स्मृती होती. आता पुढे... काही वर्षानंतर,  साधारणतः पाच वर्षांचा असणारा अमर झोपेत प्रचंड तळमळत होता. त्याची आई त्याच्या शेजारीच बसलेली होती. आपल्या मुलाला झोपल्यावर नेमकं काय होतं हे तिलाही समजत नव्हतं.  वर्षा आणि आकाश या दोघांचा एकुलता एक मुलगा असलेला अमर घरात सगळ्यांचाच बऱ्यापैकी लाडका होता.  त्यात आकाशच्या आजोबांच्या म्हणण्यानुसार अमर हा त्यांचा कोणीतरी पूर्वज होता. सुरुवातीला सगळ्यांनीच त्या गोष्टी उडवून लावल्या होत्या. पण अमर जेव्हा सात महिन्यांचा झाला. त्यानंतर एक विलक्षण घटना घडली आणि मग सगळ्यांचाच त्या गोष्टीवर विश्वास बसला.  सात महिन्यांच्या अमरला घेऊन वर्षा आणि आकाश एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे कसलातरी होम सुरू होता आणि बाहेरच्या बाजूला लहान मुलं खेळत ह...