चिताभस्म भाग 5
चिताभस्म भाग 5 पूर्वार्ध आपल्या कथेतली दोन मुख्य पात्र मात्र त्यांच्या गतजन्मांच्या आठवणींचे गाठोड सोबत घेऊन आलेली आहेत. मग विचार करा त्या दोघांच्याही पाप आणि पुण्याची गाठोडी किती मोठी असतील? आता पुढे, एकीकडे आता सदानंद आणि केशव या दोघांच्या देखरेखी खाली अमरचं ट्रेनिंग सुरू झालं होतं असं म्हणायला हरकत नाही. हळूहळू त्यांना अमरच्या वागण्यात अपेक्षित असलेले बदल दिसू लागले होते. जे भाकीत अमर बद्दल सदानंद यांना समजलं होतं ते खरं ठरेल ही भीती आता कमी होऊ लागली होती. अमरचा प्रवास आता त्याच्या ध्येयाच्या दिशेने सुरू झाला होता. तर दुसरीकडे, " आता डोळे मिटून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. हळूहळू जे स्वप्न तुम्हाला सातत्याने त्रास देत त्याचा विचार करायला सुरुवात करा. मी तीन पर्यंत आकडे मोजेन आणि त्यानंतर तुम्हाला गाढ झोप लागेल. एक, दोन, तीन ...", असं म्हणून त्या व्यक्तीने चुटकी वाजवली. आणि ज्या व्यक्तीसाठी या सूचना होत्या तिला क्षणार्धात गाढ झोप लागली. तिचा श्वास एका संथ लयीत सुरू झाला. चुटकी वाजवणारी व्यक्ती अर्थातच डॉक्टर होती. त्यामुळ...