पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चिताभस्म भाग 6

इमेज
#चिताभस्म भाग 6 पूर्वार्ध  " काय लिहून ठेवलं आहे या पोरीच्या नशिबात काय माहित?", असं म्हणत आजी स्वयंपाक घराच्या दिशेने वळाल्या.  " असं नको म्हणूस, तिचं नशीब आणि भविष्य दोन्ही खूप चांगलं असणार आहे. देव प्रत्येकालाच आपला हिशोब पूर्ण करायची संधी देत नाही हे लक्षात ठेव. पण तिला ती संधी मिळणार आहे. आणि जेव्हा ती संधी मिळेल तेव्हा ते बघण्याचं सौभाग्य आपल्याला मिळावं एवढीच प्रार्थना कर. " , आजोबा म्हणाले.  " खरं आहे तुमचं, मी सुद्धा मनोमन त्याच दिवसाची वाट पाहत आहे.", आजी भिंतीवर असलेल्या त्या फोटोंकडे पाहत म्हणाल्या.  चिनू, देसाई कुटुंबातली महत्त्वाची व्यक्ती... आता पुढे  चिन्मयी, डॉ कडे जाऊन आल्यापासून तशी शांतच होती. आजच सेशन तिला हवं तसं झालं नव्हतं. आजच्या सेशनमध्ये तिने जे काही बघितलं होतं त्यापैकी फार कमी माहिती डॉक्टर काकांना सांगितली होती. तिने असं का केलं होतं हेच तिला कळत नव्हतं.  शेवटी त्या विचारांपासून सुटका मिळवण्यासाठी तिने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तयार केलेल्या डायरीमध्ये आजच्या सेशन बद्दल लिहायला सुरुवात केली. लिहिता लिहिता तिला अजून काही गो...